लिहाल तर वाचाल
इंडिब्लॉगीज २००६ साठी आम्हाला जेंव्हा देबनी आमंत्रित केलं, तेव्हा आम्ही चाटच पडलो. आमच्यासारख्या येडपटाला असलं काम, ते पण एका एका दिग्गजांमधून 'एक्क नंबर' ब्लॉगला हुडकायचं - म्हणजे आम्ही वाट लावून टाकणार कि काय असं काहीतरी वाटायला लागलं. नंतर कळालं की जर आम्ही परीक्षक झालो, तर स्रुजन-आनंद आणि Yesterday Once More आपोआपच वगळले जाणार. मग थोडं बरं वाटलं - म्हंटलं बाकिच्यांना सुद्धा संधी द्यावी. शिवाय देसीपंडित साठी आम्ही बऱ्याचश्या ब्लॉग्जच्या चकरा मारतच असतो. त्याच्या फ़ायदा झाला ब्लॉग्ज निवडताना. आणि आम्ही परीक्षक असलो तरी जनता-जनार्दनच 'एक्क नंबर' कोण ते ठरवणार होतं, मग म्हटलं 'जाउंदे झाडून'! निवडले ब्लॉग्ज. झालं मतदान. ट्युलिपच्या फुलांसारखंच मस्तं लिहिणाऱ्या ट्युलिपला 'Best Marathi Indiblog'चं पारितोषिक मिळालं. आमच्याकडून झुक-झुक्के सलाम. रेसमधल्या बाकीच्या ब्लॉगर्सना सुध्हा सलाम. अभिनंदन! आणि जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्हाला माफ करा, मात्रं एक e-mail टाकून त्या भावना व्यक्तं करा. इंडिब्लॉगीज मध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. देबाशिषचे विशेष अभिनंदन - त्यानी अत्यंत अवघड कामगिरी एकहाती पार पाडली. ग्रेटच! या वर्षीदेखिल लिहित रहा. लिहाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल!
Labels: Blogs, Indibloggies2006
6 Comments:
Indibloggies awards chya shortlist madhe changlya blogs chi olakh zhali. Even though my blog wasn't shortlisted I was happy to discover all those good blogs. :-)Aftera ll blogging is its own reward. ;-)
ओजस तुझे लिखाण आवडले. अरे गप्पा मारल्यासारखा लिहितोस. तू इथे लिहिलेले सगळे वाचून काढले. आता ह्यापुढे रोज भेट देत जाईन.
सही है भिडू. और आने दे!
प्रमोद देव.
Thanks Pramod, adhun madhun yet jaa :)
This comment has been removed by the author.
ओजस :D कसा आहेस?
नंदन ने सुरु केलेला ’आवडता उतारा’ हा tag तुझ्याकडे पास करतेय.
http://maunraag.blogspot.com/
लिही नक्की.
Ojas, update karnaar ka?
Post a Comment
<< Home