Friday, April 21, 2006

विमान विमान पैसा दे!

ही एक माझी लहानपणीची आठवण आहे... आम्ही सहा-सात वर्षाचे असू. आमच्या घराच्या परड्यात एक खर्र-खुर्रं मोठ्ठंच्या मोठ्ठं विमान पडलेलं होतं. ते तिथं बरिच वर्षं पडलेलं असावं, कारण जेंव्हापासून आम्हाला आठंवतय तेंव्हापासून ते तिथेच 'पडिक' होतं. मग माझा माज म्हणजे काय विचारुच नका!! आम्ही 'लई' तोरा दाखवणार आमच्या दोस्त लोकांमध्ये :) दोस्त मंडळी सुध्दा वाईट्ट चाट पडणार. 'आईला... ओज्याच्या घरात विमान आहे राव' सगळी खुळी होऊन होऊन विमानाच्याच गप्पा मारणार!

मी म्हणजे आधीच जरा विचित्र माणूस. मनात ईमले बांधणारा. हे असलं काहीतरी खाद्यं मिळालं म्हणजे तर काही विचारुच नका. आमचे बाबा म्हणजे तर एक विलक्षण माणूस. त्यामुळं हे त्यांचच काहितरी काम असणार अशी आमची पक्की समजूत झालेली. त्यामुळे तर त्यांच्या बाबतचा आदर द्विगुणित म्हणतात तो की काय झालेला. असं ते विमान. दुपारच्या चान्दण्यात देखिल जाऊन ते आम्ही बघणार. असले आम्ही येडपट.
अगदी परवा-परवा पर्यंत मला या गोष्टीची फार मजा वाटायची. गूढ प्रकार हो. अशी ती आठवण. काही दिवसापूर्वी जेंव्हा मी घरी गेलो होतो तेव्हा सहजच हा विषय निघाला माझ्याकडून. हे असलं सगळं परिकथे-टाइप वर्णन ऐकून आई आणि बाबा हसून खूळे झाले पाक. तर खरी गोष्टं अशी, की आमचे एक धन्यं शेजारी (सावंत त्यांचं नाव - आम्ही त्यांना "सावता माळी" म्हणून ओळखणार!) कधीतरी बाबा आदमच्या काळात निवडणूकीला उभे राहीलेले. त्यांचं चिन्हं होतं विमान!! तर या महाभाग माणसानी एक खऱ्या-खुऱ्या विमानाच्या आकाराची प्रतिकृती तयार केलेली म्हणे, आणि ती गाडीच्या वर लावून गाडी गावभर फिरवलेली!! आता बोला. असली सगळी मजा. मी सुद्धा तेव्हा हसून लोळलो वगैरे, पण आता जेंव्हा मी त्या गोष्टीचा विचार करतो तेंव्हा मला फार वाईट वाटतं. आईनी "आतली गोष्टं" सांगितल्यावर सगळा charmच निघून गेला राव. छे.

"विमान विमान पैसा दे" असं पोरं जे लहानपणी म्हणतात ते काय असतंय ते मात्रं चांगलंच कळालं :)

5 Comments:

At 5:27 PM, April 21, 2006, Anonymous Anonymous said...

wah re wah!!

 
At 10:14 PM, April 21, 2006, Blogger Nandan said...

Ojas, blog-vishwat swagat. Kolhapuri Marathitale adhik likhan vachanyas utsuk aahe.

 
At 3:26 AM, April 22, 2006, Blogger Tulip said...

अरे वा ओजस. लागलास का मराठी ब्लॉग लिहायला. छान वाटली ही भाषा. लंपन वाचतोय असं वाटल जरासं. may be कोल्हापूर आणि कर्नाटक त्यामानाने जवळ म्हणूनही असेल.

 
At 3:26 PM, April 22, 2006, Blogger Gayatri said...

कसलं लिहिलंय! अस्सल शाळकरी कोल्हापुरी वाचून मस्त वाटलं ..विशेषत: 'नाद खुळा..' नं nostalgic बनवलं! ट्युलिप च्या 'लंपन..' वाल्या शेऱ्याला अनुमोदन.

 
At 1:09 PM, April 24, 2006, Blogger Ojas said...

Nandan, Tulip ani Gayatri.. thank you! Thodasa support tumchyakadun, ani mi lihayla lagloch bagha :) Please Lampya shi comparison karu naka. Lampan match karna ashakya ahe. That is one of the best character ever written in the history of marathi literature. Prakash Narayn Sant gelyacha jevha mala kalala hota, tevha dolyat paani ubha rahila hota. Ani asa far kwachit yeta majhya dolyat paani. Pan similarity shakya ahe, karan Lmpan cha uttar-karnataka mhanje amchya kolhapur pasun hakechya antravar!

 

Post a Comment

<< Home